News Updates

पर्यावरण विषयक लघुचित्रपट स्पर्धा : प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन

सोलापूर – महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने पर्यावरणविषयक लघुचित्रपट स्पर्धेचे आयोजन केले असून या स्पर्धेसाठी प्रवेशिका पाठविण्याची अंतिम मुदत 7 मे 2018 पर्यंत आहे.

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने यासंदर्भात जाहिरात प्रसिध्दीस दिली असून त्यात नमूद केले आहे की, जानेवारी 2016 नंतर निर्मिती करण्यात आलेले पर्यावरणविषयक लघुचित्रपट या स्पर्धेसाठी पाठविता येतील. या स्पर्धेसाठी प्रवेशिका मोफत स्वीकारल्या जातील. लघुचित्रपट मराठी, हिंदी किंवा इंग्रजी या भाषेत असायला हवेत. पर्यावरण, निसर्ग, वन्यजीव इत्यादी विषयांवरील लघुचित्रपट या स्पर्धेसाठी स्वीकारले जातील. प्रवेशिका हौशी अथवा व्यावसायिक यापैकी एका गटासाठी पाठविता येतील, तशी स्पष्ट नोंद प्रवेशिका पाठविताना त्यावर करायला हवी. प्रवेशिका पाठविताना तसा स्पष्ट उल्लेख करण्यात यावा. प्रवेशिका डीव्हीडी मध्ये 7 जून 2018 पूर्वी पोहोचतील अशा बेताने पाठवाव्यात. प्रवेशिका पाठविण्याचा पत्ता मा. सदस्य सचिव, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ,कल्पतरु, तिसरा मजला, सिनेमॅक्सजवळ, सायन सर्कल मुंबई – 400022 असा आहे. स्पर्धेचे नियम व अटी याचा तपशील www.mpcb.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.अधिक माहितीसाठी संजय भुस्कुटे , जनसंपर्क अधिकारी , महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, दूरध्वनी क्रमांक 022-24020781 यावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Related News