News Updates

कुटंबातूनच समानतेची शिकवण हवी – डॉ. माया पाटील

सोलापूर  ( दिपाली जाखलेकर, तृप्ती बसुदेपाटील) – कुटुंबात लहानपणापसूनच स्री-पुरुष समानतेची भावना मुला-मुलींच्या मनात रुजविली पाहिजे असे मत सोलापूर विदायापीठाच्या सामाजिक शास्त्रे संकुलातील इतिहास व पुरातत्वशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ. माया पाटील यांनी माध्यम मित्र समवेत बोलताना व्यक्त केले.

डॉ. पाटील म्हणाल्या की, स्त्री- पुरुष समानता आहे असे वरवर भासविले जाते. मात्र मनात ती भावना नसते.एखादी स्त्री जर मोठया पदावर कार्य करीत असेल तर पुरुष प्रधान संस्कृतीला ते रुचत नाही. स्त्रियांचा आत्मसन्मान जोपासण्याची शिकवण सर्वांनाच देण्याची गरज आहे.

अभ्यासक्रमात समावेश हवा – अर्चना चोपडे

सोलापूर विदयापीठातील सहायक कुलसचिव अर्चना चोपडे म्हणाल्या की, स्त्री-पुरुष समानतेच्या गोष्टी केल्या जातात. राजकारणात अनेक महिला सरपंच, नगरसेविका, जिल्हा परिषद सदस्य यासारख्या पदांवर निवडून येतात. मात्र त्यांचे पतीदेव त्यांच्या कारभारावर सारे नियंत्रण ठेवतात, कागदोपत्री दिलेले पन्नास टक्के आरक्षण प्रत्यक्षात उतरत नाही ,हे चुकीचे आहे. महिलांना स्वतंत्रपणे त्यांचे कर्तव्य बजावण्याची संधी दिली पाहिजे. स्त्री-पुरुष समानतेचा अभ्यासक्रमात समावेश असायला हवा.

स्वतःचा विकास स्वतः करा – वेदवाणी तोग्गी

वेदवाणी तोग्गी म्हणाल्या की स्त्रियांनी कोणावर अवलंबून न राहता , स्वतःचा विकास स्वतः करावा. सध्या प्रत्येक क्षेत्रात स्त्रियांना दुय्यम स्थान दिले जाते.स्त्री-पुरुष समानता नाहीच.

सन्मान जपा- संध्याराणी लोखंडे

आजच्या काळात स्त्री-पुरुष समानता दिसून येत नाही. स्त्री आणि पुरुष दोन्ही घटकांनी आपली मानसिकता बदलली पाहिजे. पुरुषांनी स्त्रियांचा आणि स्त्रियांनी पुरुषांचा सन्मान राखावा असे मत संध्याराणी लोखंडे यांनी व्यक्त केले.

कामात समानता नाही- निलोफर बागवान

स्त्री-पुरुष समानता शैक्षणिक क्षेत्रात दिसते मात्र, कोटुंबिक जबाबदारी स्वीकारताना कामात समानता नसते. जेव्हा पुरुष घरातील कामे करु लागली तर त्यास विरोध केला जातो. चूल आणि मूल ही महिलांचीच जबाबदारी आहे असे मानले जाते .हे सारे बदलायला हवे.

Related News