News Updates

'ज्या फळ्यावर सुविचार लिहिले, त्याच फळ्यावर 'सत्कारमूर्ती' बनलो'

बार्शी - शेठ अगरचंद कुंकूलोळ प्रशालेत सन 1999-2000 सालच्या दहावीच्या बॅचमधील विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा जमला. 18 वर्षांपूर्वी भविष्याची स्वप्ने घेऊन जी पाऊले या शाळेतून बाहेर पडली, तीच पावले आज गाठलेल्या यशाचे सेलिब्रेशन करायला शाळेत परतली होती. निमित्त होते, या शाळेतील विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशाचे आणि किर्तीचे. अॅड. असिफ तांबोळी यांनी नकुतीच न्यायदंडाधिकारी वर्ग 1 क्रमांकाची परीक्षा उत्तीर्ण केली, तर अतुल अभंगराव यांची विक्री कर निरीक्षकपदी निुयक्ती झाली. शाळेत जमलेला विद्यार्थ्यांचा हा सोहळा काहीसा भावनिक तर, शाळेतील शिक्षकांनाही अत्यानंद देणारा ठरला. यावेळी बोलताना, ज्या फळ्यावर सुविचार लिहिला, त्याच फळ्यावर सत्कारमूर्ती म्हणून नाव लिहल्याचे भावोद्गार आसिफ तांबोळी यांनी काढले.  

आपल्या वर्गमित्रांनी मिळवलेल्या यशाचे सेलिब्रेशन करण्यासाठी न्यू हायस्कूल प्रशालेत माजी विद्यार्थ्यांचा मेळा जमला. या मेळ्यासाठी सन 1999-2000 सालच्या विद्यार्थी जमले होते. शाळेतील माजी विद्यार्थी आणि बार्शीतील सरकारी वकिल, अॅड. आसिफ तांबोळी यांची न्यायाधिशपदी नियुक्ती झाली. तर दत्त नगर येथील अतुल अभंगराव हे विक्री कर निरीक्षक अधिकारी बनले. त्यानिमित्त शाळेतर्फे या दोन्ही विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना आसिफ तांबोळी भावूक झाले होते. 18 वर्षांपूर्वी ज्या शाळेतील फळ्यावर मी सुविचार लिहित होतो, आज त्याच फळ्यावर सत्कारमूर्ती म्हणून माझे नाव लिहिल्याचा आनंद शब्दात न सांगण्यासारखा असल्याचे तांबोळी यांनी म्हटले. तसेच शाळेतील विद्यार्थ्यांना करिअरबाबत मार्गदर्शनही केले. 

शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती विजया खोगरे, पवार सर, महंकाळे सर, खुडे सर, सातपुते सर यांच्यासाठी हा क्षण अभिमानाचा होता. तर सत्कारमूर्ती विद्यार्थ्यांसाठी हा सोहळा कौतुकाचा आणि भावनिकतेचा होता. या सोहळ्याला अॅड. आसिफ तांबोळी यांच्या दादी, तर अतुल अभंगराव यांच्या मातोश्री अनिता अभंगराव, तसेच शोभा जव्हेरी आवर्जून उपस्थित होत्या. तर आपल्या मित्रांच्या यशाचे होणारे कौतूक पाहायला वर्गमित्र कुणाल नरके, विशाल कोकोटे, स्वप्नील देबडवार, विशाल बडदाळे, अमोल जोहरीसंह इतरही मित्रपरीवार आपल्या कामातून वेळ काढून आज शाळेत 'हजर' झाला होता. दरम्यान, याच बॅचचा विद्यार्थी दिवंगत रविंद्र पांडेकर यास यावेळी श्रद्धाजलीह वाहण्यात आली.

Related News