News Updates

मराठी राजभाषा दिनानिमित्त एम.के.सी.एल. आयोजित ‘आय.टी.त मराठी, ऐटीत मराठी’ मोफत कार्यशाळा

 

मुंबई- माहिती तंत्रज्ञानातील माहितीची देवाण-घेवाण आपल्या मातृभाषेतून म्हणजेच समजण्यास सोप्या आणि सुलभ मराठीतून व्हावी तसेच इंटरनेटवर मराठीचा वापर वाढवून जगभरातील विविध क्षेत्रांतील ज्ञान जास्तीत जास्त लोकांपर्यंत पटकन समजणाऱ्या सोप्या मराठी भाषेतून उपलब्ध व्हावे याकरिता मराठी राजभाषा दिनाचे औचित्य साधून ‘महाराष्ट्र ज्ञान महामंडळाने’ आयटीत मराठी- ऐटीत मराठीही एक तासाची विनामूल्य कार्यशाळा २७ फेब्रुवारी ते ३ मार्च दरम्यान आयोजित केली आहे. 

जागतिकीकरणाच्या या जमान्यात मराठी भाषेच्या वापरासाठी, समृद्धीसाठी आणि उन्नतीसाठी योजिलेला हा उपक्रम सर्व वयोगटातील विद्यार्थ्यांना आणि नागरिकांना दैनंदिन जीवनात अतिशय उपयुक्त आहे.

कार्यशाळेतील मधील काही ठळक शिक्षणक्रम:

  • मोबाईलमध्ये मराठीत बोलून टायपिंग करणे – Voice Typing in Marathi
  • मराठीतून इंग्रजी व इंग्रजीतून मराठी भाषांतर करणे - Google Translate
  • ऑनलाईन मराठी शब्दकोश
  • मोबाईलवर मराठी टायपिंगसाठी स्वरचक्र अॅप.
  • मराठी भाषेमधून इंटरनेटवर माहिती शोधणे
  • मराठी विकिपीडियामध्ये मराठी भाषेतून लिहून योगदान देणेg

विविध आयटी सुविधा व टूल्स आपण मराठी भाषेतून वापरली तरच जागतिकीकरणाच्या जमान्यात मराठी भाषा जगात ऐटीत राहू शकेल म्हणून जर आयटी त मराठी (तरच) ऐटीत मराठी !

ही कार्यशाळा महाराष्ट्रातील ५०००हून अधिक MS-CIT केंद्रावर सर्वांसाठी विनामूल्य उपलब्ध आहे. नजीकचे केंद्राविषयी जाणून

घेण्याकरिता 84119 60005 येथे संपर्क साधावा असे आवाहन उदय पंचपोर यांनी केले आहे.

Related News