News Updates

गोंडवना विदयापीठाची जनसंपर्क अधिकारी पदाची जाहिरात

गोंडवाना विदयापीठ, गडचिरोली या विदयापीठाने जनसंपर्क अधिकारी हे पद भरण्यासाठी अर्ज मागविले आहेत. हे पद खुल्या प्रवर्गातून भरले जाणार आहे. यासाठी पात्रता मास कम्युनिकेशनची पदव्युत्तर पदवी आणि माध्यमात अथवा शासकीय कार्यालयात संपादनाचे कार्य केल्याचा पाच वर्षाचा अनुभव अशी लागणार आहे. या पदासाठी वेतनश्रेणी 9300-34800 असून ग्रेड पे 4300 असणार आहे. या पदासाठी अर्ज करण्याची मुदत 26 मार्च 2018 पर्यंत आहे. या पदाची जाहिरात व अर्जाचा नमुना गोंडवना विदयापीठाच्या www.unigug.org या वेबसाईटवर उपलब्ध आहे.

 

Related News