News Updates

इच्छा असेल तर यशाचा मार्ग सापडतोच - अशोककुमार

सोलापूर -  आपली इच्छा असेल आणि त्यानुसार प्रयत्न केले तर यशाचा मार्ग सापडतोच असे मार्गदर्शन सोलापूर विदयापीठातील सामाजिक शास्त्रे संकुलाचे संचालक प्रा. इ.एन. अशोककुमार  यांनी व्यक्त केले.

सोलापूर विद्यापीठातील सामाजिक शास्त्रे संकुलातील द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांना निरोप देण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक शास्त्रे संकुलाचे संचालक डॉ अशोक कुमार होते.  व्यासपीठावर, रुरल  डेवलपमेंट विभागाचे विभाग प्रमुख डॉ गौतम कांबळे , जनसंज्ञापन व पत्रकारिता विभागाचे  विभाग प्रमुख प्रा डॉ आर.बी. चिंचोलकर, पुरातत्व शास्त्र विभागाच्या विभागप्रमुख   डॉ माया पाटील,  प्रा प्रभाकर कोळेकर, अर्थशास्त्र विभागाचे  प्रा प्रकाश व्हनकडेउपस्थित होते. याशिवाय डॉ. रुपेश पवार, मधुकर जक्कन, अंबादास भासके, ज्ञानेश्वरी हजारे, स्नेहल नष्टे, तेजस्विनी कांबळे, मोनाली नारायणकर, ज्ञानेश्वर झरकर अध्यापक यावेळी उपस्थित होते.

          अध्यक्षीय भाषणात अशोक कुमार पुढे म्हणाले की कोणत्याही गोष्टीत यश प्राप्त करण्यासाठी सातत्याची गरज असते. त्यामुळे विदयार्थ्यांनी आपल्या प्रयत्नात सातत्य ठेवल्यास एक दिवस त्यांना यश नक्की मिळते त्याचप्रमाणे विदयार्थ्यांना शैक्षणिक तसेच  वैयक्तिक आयुष्यात  संशोधनाचा खूप मोठा फायदा होतो त्यामुळे जास्तीत जास्त विदयार्थ्यांनी संशोधन क्षेत्रात पुढे यावे.

           याप्रसंगी जनसंज्ञापन व पत्रकारिता, पुरातत्व शास्त्र, अर्थशास्त्र, रुलर डेव्हलपमेंट विभागातील व्दितीय वर्षातील विदयार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यात भैरव्‍ा भुसारे, विश्वनाथ चडचणे, लक्ष्मी जमादार, रामेश्वर जानकर, स्वरा राजगुरु, बालशंकर, शीतल कांबळे, स्नेहल पवार, राहुाल सोनवणे, पंकज सोनवणे, सोनल भोसले, आनंद लोखंडे आदींचा  समावेश होता.प्रथम वर्षाच्या  विदयार्थ्यांच्या हस्ते व्दितीय वर्षाच्या विदयार्थ्यांचा सत्कार करुन त्यांना निरोाप देण्यात आला.

             कार्यक्रमाच्या दुसर्‍या सत्रात विद्यार्थ्यांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते

 कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रियांका गळवे, प्रज्ञा व्यवहारे यांनी केले तर आभार अक्षता मधली यांनी मानले